तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायतचे सदस्य इर्शाद मुलाणी यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले होते .मुलाणी यांनी या निकालाविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवीत अपील फेटाळले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायतचे सदस्य इर्शाद मुलाणी प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण जागेवर 2017 ला सार्वत्रिक ग्रामपंचायत  निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार महादेव खटावकर व नामदेव कांबळे यांनी जिल्हाधिकारी ,उस्मानाबाद यांच्याकडे केली होती .तक्रारीनुसार इर्शाद मुलाणी यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 अन्वये मुलाणी यांचे सदस्यत्व पद 8 नोव्हेंबर 2021 रोजी अपात्र ठरवले होते. या निर्णयास मुलाणी यांनी विभागीय आयुक्त  औरंगाबाद यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला असून  मुलाणी यांचे अपील फेटाळले आहे. महादेव खटावकर व नामदेव कांबळे यांच्या वतीने अॅड. डी.डी. देशमुख यांनी काम पाहिले.

 
Top