उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात रमजान ईद कोरोनाच्या दोन वर्षानंतर उत्साहात साजरी करण्यात आली. 

उस्मानाबाद शहरात रमजान ईदची नमाज ईदगाह मैदान, पोलिस लाईन मस्जिद, दर्गा शरीफ येथे नमाज अदा करण्यात आला. यावेळी राजकीय नेते शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे अिग्नवेश शिंदे, प्रशांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक समाजाचा सण, यात्रा, जत्रा, मर्यांदीत स्वरूपात साजरा नाममात्र साजरा झाला होता.गेल्या कांही महिन्यापासून कोरोना महामारीचे संकट दुर झाल्यामुळे सर्व धर्मीय सण, उत्सव, यात्रा, जत्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. 

त्यामुळे रमजान ईदच्या निमित्ताने हजारो मुस्लिम बांधव, नमाज अदा करण्यासाठी ईदगा मैदान, दर्गा शरीफ, पुलिस लाईन मस्जिद आदी ठिकाणी गेले होते. ईदचा नमाज अदा केल्यानंतर अनेकांनी गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा िदल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, न.प.चे मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, तहसीलदार गणेश माळी आदींनी शुभेच्छा िदल्या. 

सर्वांच्या जीवनात सुख समृध्दी आनंद येवो-आ.पाटील


ईदची नमाज अदा केल्यानंतर बाहर पडणाऱ्या मुस्लिम बांधवांना िशवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देण्यात आले. 

रमजान ईद निमित्त शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी ईद मैदान येथे उपस्थित राहून रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी एकमेकांचे बंधुभावाचे नाते स्थापित करणारा आणि  प्रेमाने, आनंदाने साजरा होणाऱ्या रमान ईदच्या हार्दीक शुभेच्छा. रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुख समृध्दी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशा शब्दात आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 


 
Top