उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र उत्साहात साजरे होत आहे. देशातील अग्रगण्य  असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया  ”आझादी का अमृत महोत्सव”  या घोषवाक्यासह विविध उपक्रम देशभरात राबवित आहे , या अनुषंगानेच दिनांक ०२ मे २०२२ रोजी उस्मानाबाद येथे बँकेच्या वतीने टाऊन हॉल मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते.

या मीटिंग साठी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमधील ग्राहक निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बँकेचे उस्मााबाद रिजनचे क्षेत्रीय प्रबंधक श्री.विलास शिंदे, मुख्य व्यवस्थापक श्री.मिलिंद जरीपटके, श्री.सुहास माने,श्री.शरद खोले हे वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील शाखांचे शाखा प्रबंधकही उपस्थित होते.

सुरुवातीस श्री.मिलिंद जरीपटके यांनी उपस्थितांचे स्वागत केल्या नंतर भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन श्री.दिनेश कुमार खरा तसेच एम.डी.श्री. सी.एस. सेट्टी यांनी उपस्थितांशी व्हिडिओद्वारे संवाद साधला व या टाऊन हॉल मीटिंगचा उद्देश हा देशात वाढत जाणाऱ्या सायबर क्राईम च्या अनुषंगाने आपण काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देणे तसेच आपल्या परिसरातील  एस बी आय चे सर्व वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हे आपणाशी संवाद साधण्यासाठी एकाच मंचावर उपलब्ध करून देणे हा आहे असे नमूद केले.

या नंतर बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. विलास शिंदे यांनी उपस्थितांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.उस्मनाबादमध्ये बँकेच्या डिजिटल बँकिंग चे काम पाहणारे श्री.चेतन दुर्गे  यांनी सर्वांना पी पी टी च्या माध्यमातून विविध प्रकारचे सायबर क्राईम कसे होतात व ते टाळण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती दिली.

यानंतर ग्राहकांनी एकंदर बँकिंग बाबतचे त्यांचे अनुभव,अडचणी व शंका मांडल्या व उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे निराकरण केले. तसेच या स्वरूपाच्या मीटिंग या जिल्ह्यात सर्वत्र व नियमित अंतरालाने  व्हाव्यात असाही विचार ग्राहकांनी मांडला ज्यास अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.शेवटी बँकेच्या वतीने उपस्थितांचे आभार श्री.शरद खोले यांनी मानले.


 
Top