उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षेत आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद व छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद शाळेचे घवघवीत यश संपादन केले. 

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे -2022 सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे 10 विद्यार्थी, केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत 14 विद्यार्थी व छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद शाळेचे 7 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तसेच केंद्र स्तरीय गुणवत्ता यादीत 03 विद्यार्थी असे दोन्ही शाळेचे एकूण 34 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत या निमित्ताने राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंद यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही शाळेची यशाची हि परंपरा अखंड चालू आहे.


 
Top