उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील रायगड फक्शंन हॉल , विकास नगर, औरंगाबाद रोड,  परिसरातील विद्युत पुरवठा चार तासात तब्बल आठ वेळा  खंडीत झाल्याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रायगड फंक्शन हॉलचे मालक  सौ.विजया धर्मवीर कदम यांनी केली आहे. 

या संदर्भात उपकार्यकारी अभियंता म.रा.विद्यूत वितरण कंपनीस िनवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये  नमुद करण्यात आले आहे की, दि.२३ मे २०२२ रोजी विद्युत पुरवठा खंडीत होऊन त्यांचा परिणाम व्यवसायावर होऊन नुकसान झाले. या संदर्भात संबंधिताना फोन करण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद होते.त्यामुळे व्यवसायीकांना आर्थिक फटक्यासह मानिसक त्रासाचा सामना करावा लागला . विशेष म्हणजे सध्या लग्न तिथी मोठ्या प्रमाणात असताना ऐन वेळेस वीज गुल झाल्याने अनेकांना मानिसक त्रास सहन करावा लागला. महावितरण कंपनी कसल्याही प्रकारची ग्राहकांना अगाऊ नोटीस न देताच मनात आले की वीज बंद करते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. 

 
Top