उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एटीएम सेंटर्स मध्ये ग्राहकांच्या डेबीट कार्डची अदलाबदल करुन पैसे काढने, एटीएम मशिन फोडुन पैसे लुटने, ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांची फसवनुक करण्याचे प्रकार जिल्हयात अनेकदा घडले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी   बँकांच्या शाखा प्रमुखांची व एटीएम सेंटर व्यवस्थापकांची ऑनलाईन बैठक घेतली. 

बँका व एटीएम संबंधी सुरक्षेचे पोलीस विभागामार्फत वेळोवेळी ऑडिट केले जाणार असुन फसवणुकिला आळा घालण्याच्या द्रष्टीने बँकांच्या सर्व शाखा व सर्व एटीएम सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व अलार्म यंत्रणा हे सदैव सुस्थितीत ठेवावेत. बँकांच्या सर्व शाखा व सर्व एटीएम सेंटर मध्ये सदैव सुरक्षा रक्षक उपस्थित असने गरजेचे आहे. यासोबतच ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात बँकांनी पोलीसांशी समन्वय राखुन फसवणुक रक्कम ग्राहकांना परत मिळण्यास सहकार्य करावे. अशा सुचना यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी संबंधीतांना केल्या आहेत.

 
Top