उस्मानाबाद / प्रतिनिधी-

न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये झटपट न्यायनिर्णय व्हावेत,या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि.7 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता उस्मानाबाद येथील  जिल्हा न्यायालयात आणि सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

  या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी खटले,मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे,धनादेशाचे प्रकरणे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग उस्मानाबाद येथील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच मोटारवाहन भंगाची वाहतुक शाखेची दाखल पुर्व प्रकरणे समेटासाठी पक्षकारांनी पुढे यावे आणि लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे के.आर.पेठकर आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव वसंत यादव यांनी केले आहे.

 
Top