तुळजापूर  / प्रतिनिधी-

गुढीपाडव्या नंतर भाविक  मोठ्या संख्येने देवदेवतांचे  देवदर्शन कुलदैवतांचा कुलधर्मकुलाचार पुर्ण करण्यासाठी हिंदू धर्मियांनसह अन्य धर्मीय भाविक सहकुंटुंब मोठ्या संख्येने तिर्थक्षेत्र तुळजापूरात दाखील होत असतात.  त्यामुळे  येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समितीने मंदिरसमोर व मंदीर प्रांगणात रस्त्यावर भाविकांसाठी शेडनेटची गार सावली तयार केली आहे.त्यामुळे  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

  सध्या  तापमान ४० अंश  सेल्सियसच्या पुढे गेले आहे .  भाविकांचे पाय पोळु नये व उन्हाचा त्रास  भाविकांना होऊ नये यासाठी  श्र ीतुळजाभवानी  समितीने  मंदीरा समोर व  मंदिर परिसरात  हिरवे शेडनेट तर जमिनीवर मँट अंथरले आहे.  गेली अनेक वर्षांपासून श्रीतुळजाभवानी मंदीर प्रशासनाकडून अशा प्रकारची सुविधा दिली जात आहे.  याचा लाभ प्रामुख्याने  वृद्ध , लहान मुले , महिला आजारी भाविक यांना होत असतो. 


 
Top