गुरूवार पासून विविध प्रकल्पांना देणार भेटी

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेल्या सर्वच विभागाच्या विकासकामांचा आढावा व पाहणी करण्यासाठी ३५ आमदारांचा समावेश असलेली विधीमंडळ अंदाज समिती येणार आहे. गुरूवारपासून रविवारपर्यंत (दि. १०) प्रत्येक कामांची बारकाईने तपासणी करण्यात येणार असून प्रशासनाकडून त्या दृष्टीने लगबग सुरू झाली आहे.

आमदार रणजित कांबळे समितीचे प्रमुख आहेत. समितीचा गुरूवारी येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम असणार आहे. विश्रामगृहात विविध विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर समितीची अंतर्गत बैठक होणार आहे. तसेच विविध विभागांच्या अंतंर्गत झालेली कामे व प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार आहे. महसूल, वन, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषधी द्रव्य, उद्योग व खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, जलसंपदा, पशु संवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, ग्रामविकास, गृह, फलोत्पादन, पाणी पुरवठा, पर्यावरण, मृद व जलसंधारण, सहकार, पणन, उच्च व तंत्रशिक्षण विभागांच्या व अन्य विभागांच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे.

सध्या सर्वच विभागाचे कर्मचारी व अधिकारी समितीच्या पाहणीच्या अनुषंगाने माहिती संकलन करण्यात व्यस्त आहे. समितीच्या निवास व अन्य व्यवस्थेसाठीही प्रशासनाची कसरत सुरू आहे.

 
Top