काटी (प्रतिनिधी) :  

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि.(5) रोजी सायंकाळी सहा वाजता ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आरक्षण संघर्ष यात्रेचे येथील मुख्य बाजार चौकातील दत्त मंदीरासमोर आगमण होताच या रथयात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आदेश कोळी यांनी जंगी स्वागत केले. या संघर्ष यात्रेत काटीसह परिसरातील नागरिक ओबीसी आरक्षणासाठी सहभागी झाले होते.

       यावेळी बोलताना रमेश बारस्कर म्हणाले की,ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण हे आता रस्त्यावर उतरून मिळवले पाहिजे व याचा एल्गार ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर करू, असा इशारा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला. तसेच  ‘ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण‘  मिळविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी लढा देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी   केले.   यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर, सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर,अशोक जाधव, सयाजीराव देशमुख,पत्रकार उमाजी गायकवाड, करीम बेग, मारुती रोकडे, अतुल क्षिरसागर, शिलवंत क्षिरसागर,   ग्रा.प. सदस्य बाळासाहेब भाले,बळी चवळे, सचिन काळे, लोमेश काळे, बबन हेडे, भैरी काळे, जुबेर शेख,  शिवलिंग घाणे,सागर अष्टुळ, सुलतान पटेल, सिध्दार्थ एकमल्ले, नामदेव काळे,सिध्दीनाथ ढगे, दादासाहेब चवळे, तानाजी हजारे, संतोष काळे आदी उपस्थित होते.

 
Top