तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस या वर्षीच्या आर्थिक वर्षात ५५ लाख ५४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे संपूर्ण तुळजापूर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेने 20 वर्षाच्या कालावधीत सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे संस्थेचे हे विसावे वर्ष असून संस्थेकडे भाग भांडवल म्हणून १ कोटी २४ लाख ५० हजार रु असून संस्थेकडे १२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तसेच संस्थेनं आपल्या सभासदांना लहान मोठ्या उद्योग व्यवसायवाढीसाठी ९ कोटी ३६ लाख रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेची कर्ज वसुली ९५% इतकी आहे संस्थेने स्वतःच्या नावाने विविध बँका मध्ये ठेवीच्या स्वरूपात ५ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी मध्ये गुंतवणूक केलेली आहे संस्थेस सतत लेखापरीक्षण वर्ग अ असून संस्था दरवर्षी ११ % व्याजदराने जवळपास १२ लाख रु लाभांश संस्थेच्या सभासदांना रोखीने वाटप करते 

संस्थेच्या वतीने आकर्षक व्याजदराने सर्वप्रकारच्या ठेवी स्वीकारण्याची सोय करण्यात आली असून संस्थेच्या सभासदांना अत्यल्प व्याजदरात सोनेतारण वाहन तारण स्थावर मालमत्ता तारण अशा अनेक प्रकारच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येते संस्थेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून संस्था ही स्वामालकीच्या जागेत कार्यरत असून लवकरच तुळजापूर खुर्द येथे असलेल्या संस्थेच्या जागेत संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी दिली आहे. संस्थेच्या वतीने सभासदांच्या सोयीसाठी मिनी एटीएम सुविधा सुरू करण्यात आली असून संस्थेच्या सभासदांना दैनंदिन व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी एसएमएस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे संस्थेच्या वतीनं दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या मध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या मध्ये संस्थेच्या वतीने जवळपास आठशे पिशव्या रकत्संकलन केले आहे 

संस्थेच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग दोन वर्षे प्राप्त झाला.

 
Top