तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटीचे विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे सातवाहन काळात आर्थिक राजधानी होती .त्या काळात परदेशी व्यापारी संबंध होते .तेर येथे कै. रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय असून संग्रहालयातील पुरातन वस्तू पाहण्यासाठी व पुरातन वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी देश-परदेशातील पर्यटक तेर येथे येत असतात. तसेच तेर येथे त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, कालेश्वर मंदिर, जैन मंदिर, विटांनी बांधलेले तीर्थकुंड, सिद्धेश्वर मंदिर, शिखरेश्वर मंदीर, वाळकेश्वर मंदिर ,विटांनी बांधलेले चैत्यगृह ,श्री ‌संत गोरोबा काका यांचे मंदिर व घर तेर येथे आहे. या सर्व मंदिर व पुरातन वास्तू यांच्या सर्वांगीण विकासासाठी व तेरणा नदीच्या दोन्ही तीरावर दगडी घाट बांधण्यासाठी व भाविक भक्तांच्या राहण्यासाठी धर्मशाळा बांधणे आवश्यक असून वाहन तळ करणे आवश्यक आहे तसेच तेर मध्ये 24 तास पाणी व 24 तास वीजपुरवठा राहण्यासाठी 100 कोटीचे विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील राहुल गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top