लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील नागूर येथे गुढीपाडवा व  हिंदू नवं वर्षाचे स्वागत  मारूती मंदिर चौकात पुस्तकांची गुढी उभारून  करण्यात आले. 

सामाजिक कार्यकर्ते यशवंत चंदनशिवे यांच्या पुढाकारातून नव्या पिढीला नवा विचार देण्यासाठी शिक्षणांचं, वाचन संस्कृतीचे महत्त्व आजच्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात पटवून देण्यासाठी, संस्कार, संस्कृती, अध्यात्माची सांगड घालून जे वाचन केले जाते त्यातूनच बालकांनवर संस्कार होतात. त्यासाठी मोठयांनीही वाचन संस्कृतीचा पून्हा अंगीकार करावा व तो बालकांनवर रूजवावा यासाठी ही पुस्तकांची गुढी, गुढीपाडव्या निमित्ताने उभारली गेली आहे. असे यशवंत चंदनशिवे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले. 

यावेळी सरपंच गजानन जावळे, शंकर भोसले, चेरअमन चंद्रकांत पाटील, शाहुराज भोसले, जनार्दन  पाटील, दत्तात्रय जाधव, आदी ग्रामस्थ, बालके उपस्थित होते.

 
Top