उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन शुक्रवार दि.०१ मार्च २०२२ रोजी, रांजणी ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात रांजणी व परिसरातील सर्व वयोगटातील ५६० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन तेरणा ट्रस्ट चे विश्ववस्त आशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी सभापती दत्तात्रय साळुंके, फेरोज पठाण, मुख्याण्यापक गुरव सर, मतीन पटेल ग्रा.प.सदस्य, आलिम भाई शेख, मुजमिल सय्यद, उपसरपंच आन्सरभाई शेख, सोसायटी व्हाईस चेअरमन वाहेद शेख, आलीम कुरेशी, जानुमिया बागवान, अलिबाबा पटेल, नाना गायकवाड, उस्मान पाशा शेख, मुसा शेख, अंगद सोनपारखे, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा कार्यकर्ते, ग्रा.प. लिपिक अनवर शेख, सामाजिक कार्यकर्ते ताहेर पटेल, श्रीकिसन आगरकर, आदि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ निमेश पाटीदार, डॉ रोहित कोळी ,डॉ आदर्श यादव, डॉ जय ओरा, डॉ दिपक बाराते, डॉ परविन सय्यद, डॉ शगुफ्ता सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे यांनी परीश्रम घेतले.

 
Top