उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महागाई विरोधात युवासेनेचे आज राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवासेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने उस्मानाबाद शहरातील हंबीरे पेट्रोल पंप येथे युवासेनेने थाळीनाद आंदोलन केले. 

केंद्र सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु सध्य स्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा चा कयास लावला होता. त्याप्रमाणे थाळी वाजवल्या नंतर तरी कमी मोदी साहेबांना महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी व केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई चे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ज्यामुळे तर कमीत कमी केंद्र सरकारला त्याची लाज वाटून ते महागाई कमी करतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,विभागीय सचिव युवासेना जिल्हासमन्वयक तथा सरपंच अॅड.संजय भोरे,युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, उपजिल्हाप्रमुख  गणेश ,काँलेज कक्ष प्रमुख अजय धोंगडे,जगताप,युवासेना तालुका प्रमुख वैभव वीर ,युवासेना शहर प्रमुख रवि वाघमारे,तालुका संघटक ,व्यंकट कोळी,विधानसभा प्रमुख पांडुरंग माने,तालुक़ा सचिव गुरुनाथ गवळी,शिवसेना सोशल मीडिया जिल्हा समन्वयक राज जाधव,युवासेना सोशल मीडिया जिल्हा समन्वयक ,उपतालुक़ा प्रमुख किरण चव्हाण,युवासेना उपशहर प्रमुख मनोज उंबरे,युवा नेते अभि कदम,दिनेश बंडगर,अरुण राठोड,संदीप बनसोडे,निखिल धोडके,ओंकार आगळे,अमन शेख़,अनिरुद्ध जवळेकर,संदीप गायकवाड,साबेर सय्यद,राकेश सूर्यवंशी,सागर राठोड,अतुल खराडे,सोनू पवार,आतिक सय्यद,अविनाश इंगळे,नितिन लोमटे,सतीश लोंढे,शिवप्रताप कोळी,साईराज शेंडगे,रूपेश शेटे ,मनोज गुळवे,अनिल दाणे,रोहित कदम आदि युवासैनिक उपस्थित होते


 
Top