तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील  श्रीतुळजाभवानी मातेस उन्हाळ्यात असाह्य उष्णते पासुन सुटका व्हावी  म्हणून देविजींना   मखमली  पंख्याने वारा घालण्याच्या विधीस  रविवार    दि. ३ पासुन आरंभ झाला आहे.

गुढी पाडवा झाला की दुसऱ्या दिवसा पासुन श्रीतुळजाभवानी माता मुर्तीस दुपारी एक ते चार या कालावधीत मखमली  पंख्याने वारा घालण्यास आरंभ होतो दुपारी चार वाजेपर्यंत अखंड वारा घातला जातो .देविस पंख्याने वारा घालण्याचा मान पलंगे घराण्याकडे असुन त्याघराण्यातील व्यक्ती अडीच महिने अखंड पणे देविस मखमली पंख्याने वारा घालते.  देविस पंख्याने वारा घालताना देविजींचा मुखगर्भगहात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. सदरील पंख्याने वारा घालण्याचा  विधी मृग नक्षत्र पाऊस   पडे पर्यत घातला जातो.


 
Top