उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर होणाऱ्या आगामी कार्यक्रमाचे नियोजन व सूक्ष्म ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीबाबत उस्मानाबाद जिल्हा ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न झाली. ही बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शना खाली झाली. या बैठकीला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा मराठवाडा प्रभारी प्रदीपजी तांदळे, विनयजी सगर मराठवाडा संपर्क प्रमुख,  भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाप्रभारी देवीदासजी काळे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

 या बैठकीला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस पिराजी मामा मंजुळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य  खंडेरावजी चौरे, भाजपा जिल्हा समनवयक नेताजी आबा पाटील, भाजपा जिल्हा महामंत्री नितीनजी भोसले,  भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर , ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, प्रमोद बचाटे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य, राम लवटे, रणजित हापटे, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष छायाताई खराटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, लक्ष्मण माने, राहुल गोरे, उस्मानाबाद शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ, सरचिटणीस श्रीराम मुंबरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन महेंद्र बिदरकर व आभार अपंडुरंग लाटे सर यांनी व्यक्त केले.

 
Top