उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 लिंगायत समाजाच्या विविध  प्रलंबित मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे राज्य समन्वयक काकासाहेब कोयटे यांनी साखरे बिल्डिंग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे. राज्य संघटक गुरुनाथ बडुरे.मराठवाडा अध्यक्ष उदय चौंडे.उपाध्यक्ष शिवानंद कथले.जिल्हाध्यक्ष लक्ष्मण उळेकर  आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कोयटे यांनी सांगितले की.राज्यात एक कोटी समाज बांधव असून समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी नांदेड येथे तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थित 2000 साली लाखो लोकांच्या उपस्थित भव्य अधिवेशन घेण्यात आले होते त्यावेळी काही मागण्या मंजूर करण्यात आल्या.समाजाची मुख्य मागणी आरक्षणाची होती यामुळे 

2014,साली मुंबई येथे संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन तसेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या गावी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले व लिंगायत वाणीस ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले.परंतु दाखल्यावर हिंदू लिंगायत उल्लेख असलेल्या समाज बांधवांना याचा लाभ मिळत नाही .सोलापूर.उस्मानाबाद लातूर या ठिकाणी समाज बांधवांची   संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लाखो समाज बांधव या सवलती पासून वंचित आहेत . शासनाने शुद्धिपत्रक ही अडचण दूर  करावी तसेच बाराव्या शतकातील थोर  समतेचे नायक महात्मा जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ या मागण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत .याची दखल घेऊन शासनाने  सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  मंगळवेढा येथील स्मारकासाठी समिती गठीत केली होती या समितीने स्मारक होण्याच्या दृष्टीने दिशेने चांगले  प्रयत्न केले. राज्यात सत्तातर झाल्यावर या प्रलंबित मागण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदजी पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार. व ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन आम्ही आमच्या मागण्या मांडल्या. यानंतर  11 मार्च रोजी शासनाने मंगळवेढा येथे स्मारकासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठीत केली असून या समितीत संघर्ष समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शासनाने सर्व समाज बांधवांना ओबीसी आरक्षणाचा आरक्षण लाभ मिळण्यासाठी शुद्धिपत्रक काढण्यात यावे .महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जागा व निधी उपलब्ध करून करण्यात यावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून  महामंडळास 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावी. या मागण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवानंद हैबतपुरे, उदय चौंडे, अनिल चौगुले, सागर मुंडे, निलेश होनराव, चंद्रशेखर दणदणे, भगवान कोठावळे, अरुण आवटे,  बसवराज पाटील आदी उपस्थित होते.

बिजनेस एक्सपो 

वीरशैव  लिंगायत समाजातील बेरोजगार युवा-युवती-महिलांसाठी बिजनेस एक्सपो व स्मॉल मशनरी एक्सपो चे आयोजन करण्यात येणार आहे. यामधुन मशनरी घेणाऱ्यांना आर्थपुरवठ्यासह प्रशिक्षण, उत्पादन होत असलेल्या मालाचे उत्पादन पॉकींग आदी व्यवस्था संघटना करणार आहे. याद्वारे समाजाची एकी व ताकद दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी काका कोयटे यांनी मंगळवेढा हे महात्मा बसवेश्वर यांची कर्मभुमी आहेे. येथे जागतीक दर्जाचे स्मारक व्हावे, त्याच प्रमाणे कपीलधार येथे मन्मथ स्वामी व परिसराचा विकास व्हावा, यासाठी सरकारच्या वतीने निधीची तरतुद करून काम करण्याची मागणी ही त्यांनी केली. 


 
Top