उस्मानाबादेतील 150 एकर जमीन जप्त

 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) - 

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दणका दिला आहे, मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने केली केली आहे. जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून जमीन खरेदी केली शिवाय मलिक हे शेतकरी नसताना त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ही जमीन खरेदी केली.

मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे.जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे.150 एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून ? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करित जप्तीची कारवाई केली.भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी हे प्रकरण उचलून धरत बेनामी संपत्ती बाबत गंभीर आरोप केले होते.

ईडीने जप्त केलेल्या 150 एकर जमिनीत एक मोठा 2 मजली बंगला आहे शिवाय जनावरांचा गोठा आहे. जमीन खरेदी वेळी मूल्यांकन कमी दाखविण्यासाठी हा बंगला कागदावर दाखविण्यात आला नव्हता.


१५ दिवसापुर्वी माहिती मागविली

नवाब मलिक यांच्या परिवारांनी घेतलेल्या जमिनीच्या कागदपत्राची माहिती ईडी कार्यालयामार्फत १५ दिवसापुर्वी मागविली होती. मागविलेल्या माहितीनुसार सदर माहिती आम्ही त्यांना सादर केली आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाचे ढाहाळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 


हे होणारच होते

आपणच नवाब मलिक यांच्या जमिनीबाबतची तक्रार व कागदपत्र दिले होते. ईडीने मुंबई बाहेर केलेली ही पहिली कारवाई  आहे. सदर जमिनीबाबचे व्यवहार संशयास्पद असल्यामुळे हे प्रकरण आपण उचलून धरले होते. त्यामुळे सदर प्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी उस्मानाबाद भाजपाचे जिलाध्यक्ष िनतीन काळे यांनी केली आहे. 

 
Top