उस्मानाबाद / प्रतिनिधी :-

उस्मानाबाद शहरात बुधवार दि. १३  एप्रिल रोजी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरवर विक्रांत घोटाळ्यातील फरार आरोपीची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

बुधवार दि. १३ एिप्रल रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्यासंरक्षक भिंतीवर त्यांच्या प्रमाणे अन्य प्रमुख चौकातील दर्शनी भागात भाजप खासदर किरीट सोमय्या यांच्या विषयी फरार आरोपी, मोस्ट वॉन्टेड अशा प्रकारचा मजकुर  लिहीलेले पोस्टर लावण्यात आलेले आहेत. सदर पोस्टरवर आरोपीस शोधुन आणणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. पोस्टर शेवटी देशप्रेमी संघटना धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे.सदर पोस्टर जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीवर लावल्याचे समजताच ते काढण्यासाठी खास लोकांची नियुक्ती करण्यात आली. 

 
Top