परंडा / प्रतिनिधी : - 

ग्रामपंचायत नियुक्त प्रशासकांचा मेहतांना देण्यात यावा या विषयाचे अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ साहेब यांची दि.२७ रोजी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.चर्चेवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पंचायत चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांना  तातडीने परंडा गटविकास अधिकारी यांना पत्र द्यावे असे सुचित केले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ यांनी गटविकास अधिकारी परंडा यांना पुन्हा पत्र देऊन कळवितो बाकीच्या सर्व तालुक्यांत मेहनताना मिळाला आहे, परंडा तालुक्याला ही लवकरच मिळून जाईल असे प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले.

     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर ७० विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक यांना प्रशासक म्हणून दि.१० सप्टेंबर २०२० च्या आदेशानुसार नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.

संदर्भिय शासन निर्णय दि.२८ मे १९९२ नुसार स्वत:चे काम सांभाळून एका ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळवेतनाचे ५ टक्के मेहनताना व स्वतःचे काम सांभाळून एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळवेतनाचे १० टक्के मेहनताना देय आहे.नियमानुसार ग्रामपंचायत प्रशासक यांना मेहनताना देऊन न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष  विशाल अंधारे, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top