कळंब / प्रतिनिधी- 

 लालसोट जि दौसा, राजस्थान येथील आनंद हाॅस्पीटल च्या प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व सुवर्णपदक विजेत्या डॉ अर्चना शर्मा यांनी गावगुंडाचा त्रास, खंडणी व पोलीस अधिका-या मार्फत लावलेल्या ३०२ कलमामुळे ,त्रासून राहत्या घरी आत्महत्या केली. सुसाईड नोट पोलीसांना मिळाली असून त्यात त्यांनी स्वतः निर्दोष असुन पेशंटच्या मृत्युस त्या जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.

सदरील पेशंट त्यांच्याकडे डिलिव्हरी साठी आला होता. डिलिव्हरी सुखरूप झाली. बाळ सुखरूप आहे. नंतर (PPH ) अतिरक्तस्राव झाला. दोन बॉटल रक्त दिले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु शेवटी पेशंट दगावला. याचा राग धरून पेशंट चे नातेवाईक, गावगुंड , खंडणी बहादर व राजकारणी मंडळींच्या हस्तक्षेपामुळे पोलीस यंत्रणेने डॉक्टरांच्या तज्ञ कमीटीचा सल्ला न घेता लागलीच मर्डर चे 302 कलम लाऊन पोलीस केस फाईल केली. यामुळे डॉ अर्चना घाबरून गेल्या. आपली खुप बदनामी होईल, मला फाशीची अथवा जन्म ठेपेची शिक्षा होईल असे त्यांना वाटू लागले. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

सदरील घटनेचा कळंब आयएमए कडून जाहीर निषेध करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींना कठोरातील कठोर शिक्षा करावी,  या मागण्याचे निवेदन विभागीय अधिकारी मा अहिल्या गाठाळ  यांना देण्यात आले. यावेळी कळंब आयएमएचे अध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ.सत्यप्रेम वारे, माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. नितीश गावडे, डॉ. दिनकर मुळे, डॉ.सुशिल ढेंगळे, डॉ. दिपक कुंकूलोळ आदी उपस्थित होते.


 
Top