तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी  मातेस बार्शी येथील देविभक्त  रोहीत रतन अंधारे, (रा. बार्शी) यांनी श्री तुळजाभवानी मंदीर प्रशासनास देविस घालण्यासाठी  सोन्याचा एक लक्ष्मी हार 108.070 मिली ग्रॅम वजनाची अर्पण केला.

 यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, फोटो, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, महेश गंजे, रवी गायकवाड, संकेत वाघे, पुजारी जगदीश पाटील व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते . 

 
Top