तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजनेतून मिळालेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून गावातील विविध भागात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या शिफारसीनुसार व जि.प.सदस्या अर्चनाताई पाटील यांच्या पाठपुराव्याने २५/१५ योजनेतून तेर येथील विठ्ठलनगर भागातील २७० मीटर लांबीच्या सिमेंट रस्ता व जिल्हा परीषदच्या सेस फंडातून ७ लाख रूपये खर्चून विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या  हायमास्ट लँम्पचे लोकार्पण अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, अजित कदम,इर्शाद मुलांनी, मंगेश पांगरकर, प्रतिक नाईकवाडी, पांडुरंग बगाडे, भारत नाईकवाडी, आरशाद मुलानी,भुषण भक्ते, अशोक पवार, अविनाश माने, हरी भक्ते , अभिजीत सराफ, केशव वाघमारे, युवराज इंगळे, सुनिल गायकवाड, प्रभावती वाघमारे, लतिका पेठे ,अल्का मोरे, रमादेवी वाघमारे, अविनाश खांडेकर, वैभव डीगे, बाळासाहेब रसाळ, अशपाक शेख उपस्थित होते.  

 
Top