उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी उस्मानाबाद येथे महाराष्ट्र शेतकरी ट्रेनिंग मल्टीसर्विसेस सेंटर  सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन दि. 02 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते, अल्पसंख्याक पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा आळणी शाळेचे मुख्याध्यापक, हाजी बशीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती शासकीय इमारतीजवळ सुरू झालेल्या या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस तथा शाहू पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब वाघमारे, मुप्टाचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.रवी सुरवसे, अल्पसंख्याक पतसंस्थेचे संचालक मालोजी वाघमारे, महादेव वाघमारे, अभियंता चंद्रकांत माने, केंद्रप्रमुख जगदीश जाकते, कास्ट्राईब संघटनेचे जानराव, उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात श्री. तांबोळी म्हणाले, या संस्थेमार्फत सर्व समाज घटकातील उद्यमशील सुशिक्षित बेरोजगार, होतकरू महिला, पुरुष शेतकर्‍यांना विविध 500 प्रकारच्या लघु, मोठ्या उद्योगावर कर्जाबरोबर याठिकाणी प्रशिक्षण घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. या सेंटरच्या माध्यमातून आपली व कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहन केले. तसेच उस्मानाबाद हेड क्लस्टरचे संचालक शाम हिंगे यांना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला.

कार्यक्रमात प्रा.रवी सुरवसे, बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब निकाळजे, संचालक श्याम हिंगे, सुनील हिंगे, राम हिंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन मालोजी वाघमारे यांनी  केले. कार्यक्रमाला सुरेश भालेराव, धम्मदिप सवाई, श्रीमती प्रियांका धनवे, प्रवीण लोमटे, विनोद काळे, ग्रामविकास अधिकारी धाकडे, रवी कांबळे, अभिजित वाघचौरे आदीसह तरुण, शेतकरी उपस्थित होते.

 
Top