तुळजापूर / प्रतिनिधी-

देशात सध्या निर्माण झालेल्या अराजकतेच्या वातावरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारांची गरज आहे. काँग्रेस पक्ष हाच सर्वांना समान न्याय देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाची विचारधारा घराघरात पोहचविण्याचे काम युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी केले.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.1) युवक काँग्रेसचे प्रदेश नूतन उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, तालुकाध्यक्ष अभिजीत कदम, व उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी हे जास्तीत जास्त युवकांना पक्षात संधी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येणार्‍या काळात सर्व स्तरातील लोकांपर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी करावे, असेही त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमास काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक मगर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील,  जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, अणदुरचे सरपंच राम आलुरे, माजी जि. प.सदस्य मुकुंद डोंगरे, पंडीत जोकार, अख्तर काझी, इमाम शेख, काँग्रेसचे नळदुर्ग शहराध्यक्ष नवाज काझी, महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा कल्पना गायकवाड, सुभद्राताई मुळे, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, अभिजित कदम, बालाजी बंडगर, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, धनराज मुळे, रोहीत पडवळ, बालाजी मोकाशे आदीसह काँगेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top