उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्याने खरीप पूर्वतयारी संदर्भात  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी कृषी सहाय्यक नितीन जाधव यांनी खरीप हंगामासाठी घरचे बियाणे वापरून उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना कृषी सहाय्यक नितीन जाधव म्हणाले शेतकऱ्यांनी शक्य असल्यास उन्हाळ्यामध्ये बीजोत्पादन केलेल्या सोयाबीनची पेरणी करण्यासाठी बियाणे वापरावे. सोयाबीन पेरतेवेळी शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने बियाण्याची उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही तसेच शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून बियाणे वापरावे. राज्य शासनाच्या वतीने पोखरा अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी बीबिएफ पेरणी सोयाबीनची केल्यास त्यासाठी अनुदान ही दिले जात आहे तसेच सोयाबीन पिका वरील विविध प्रकारचे किड व रोग प्रतिबंधक उपाय याबाबतही जाधव यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी कृषी सहाय्यक जाधव म्हणाले शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि खरीप हंगामात पेरणी करत असताना दहा टक्के रासायनिक खते कमी वापरून उत्पन्न वाढ करण्यावर भर द्यावा . शेतकऱ्यांनी गांडूळ खत व नाडेप मनरेगा फळबाग यासाठी पुढाकार घेऊन कृषी उत्पादनाचा खर्च कमीत कमी करून उत्पन्न वाडवर लक्ष केंद्रित करावे असे परत केले तसेच यावेळी ग्राम विकास आराखडा तयार करणे संदर्भात शेतकऱ्यांची चर्चा करण्यात आली.

 यावेळी शेतकरी अरुण सारफळे, उत्तरेश्वर एडके, विकास सोनवणे, आमोल देशपांडे, विजय तांबे,  हनुमंत सोनवणे, हनुमंत ढोकळे, अशोक ढोकळे, गणेश एडके, नवनाथ धर्मे, सुनील संकपाळ, बळवंत संकपाळ, राजेश  ढोकळे, धनाजी तांबे, रामेश्वर ढोकळे, बाळासाहेब ढोकळे, दिगंबर ढोकळे, चंद्रकांत सरफळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top