उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील गवळी गल्लीत गवळी समाजाच्यावतीने  गुढीपाडवा व नववर्ष प्रारंभ या निमित्ताने म्हशी पळविण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

 नववर्ष ,कोरोना निर्बंधमुक्त होणे या आनंदात पशूपालकाने म्हशी व रेडे पळवून सामाजिक आनंद  द्विगूणीत केला. रणवाद्य हलगीच्या आवाजात व मोटारसायकलच्या आवाजावर ,घोंगडी- शिट्टी 

इशारावर म्हशी-रेडे पळविण्याची चढाओढ लागली होती.

रेडे अत्यंत सुंदर- आकर्षक मोरपिसाचे बनविलेले मुरकूजा,फुलाने सजवून आणले होते.यावेळी रेडे व म्हैस गवळी समाजाचे कारभारी काशिनाथ दिवटे, भिमाशंकर दहिहंडे यांच्यासमोर सलाम करून पशूपालकांचा टिळा लावून,पानसुपारी व साखरेचा हार देवून सन्मान केला.पशूपालनास प्रोत्साहन दिले.

 अनंत कूराडे,राहूल व दादा सुरवसे,ज्ञानेश्वर रायबाण,मिसाळ शंकर,मलकूनाईक,प्रकाश काकडे,करीम कुरेशी,बाबा कुरेशी,अभिजीत कदम,मच्छिंद्र हवालदार,राणा  बनसोडे,उंबरे, साळुके,विठ्ठल आपुणे ,शेरकर, रामा घोगरे, सोनवणे,माळी,केदार उपाध्ये आदींनी   प्रेक्षकांची मने जिकली.सतत चार तासाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत दिवटे,नंदकुमार हुच्चे,दुर्गेश-राजकुमार दिवटे,कल्याण गवळी,वैभव-मनोज अंजिखाने,दहिहंडे बंधू, मिसाळ बंधू, अप्पा खरवरे, पंगुडवाले बंधू कुरेशी बंधू, दिवटे बंधू,  इ.प्रा.गजानन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. आभार व समारोपभालचंद्र हुच्चे यांनी केले.

 
Top