उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर दि.27 आणि 28 एप्रिल रोजी  उस्मानाबाद जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत आहेत.त्याचा दौरा  पुढील प्रमाणे आहे.

बुधवार दि.27 एप्रिल 2022 रोजी रात्री 09.00 वाजता मुंबई येथून उस्मानाबाद कडे प्रयाण.गुरूवार दि.28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 04.37 वा.उस्मानाबाद कडे प्रयाण. सकाळी 11.00 ते 01.00 वा. उस्मानाबाद जिल्हा परिषद सभागृह येथे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी,यांच्या सोबत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा बैठक दुपारी 01.00 ते 02.30 वा. पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा बैठक संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य  आहे. बैठकीचे ठिकाण:जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी 02.30 ते 03.30 वा.अध्यक्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,उस्मानाबादकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा. तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. दुपारी 04.00 ते 05.00 वा.अनुसूचित जाती जमातीच्या संघटना आणि व्यक्तींची निवेदने स्वीकारून चर्चा करणे.सायं 06.00 वा.उस्मानाबाद येथून सोलापूर कडे प्रयाण.


 
Top