उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील भोगजी येथील सबस्टेशनवरुन आढाळा फिडर वेगळे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकरसह या परिसरातील शेतकर्‍यांनी   जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील भोगजी 11 केव्ही एजी फिडरसाठी आढाळा येथील 11 केव्ही लिंक लाईन करिता अंदाजपत्रक ईई/ओएसडी/टीएस/डीपीसी-एनटी/ओएसडी-डीआयएसटी/666 हे 23 नोव्हेंबर 2021 नुसार मंजूर झाले. 33/11 केव्ही भोगजी उपकेंद्र अंतर्गत असणारे 11 केव्ही भोगजी एजी फिडर हे ओव्हरलोड असल्यामुळे या गावांना एक दिवसआड विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे सदरील काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्या अनुशंगाने सदरील कामाचे कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देण्या संदर्भात संबंधितांना सुचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात संजय पाटील दुधगावकर, शेतकरी भिमा हगारे, अण्णासाहेब शिंदे यांनी केली आहे.


 
Top