तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील खंडाळा येथील महादेवाच्या मानाच्या कावडीचे गुरुवार दि. ७रोजी भोपे पुजारी धनंजय कदम पाटील यांच्याकडुन श्री देविजींचा शंभुमहादेवाला भरपेहराव अहेर घेऊन शिखरशिंघणापुर कडे मार्गस्थ झाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खंडाळ्याच्या कावडिंची मागिल 350 वर्षांपासुनची परंपरा अबाधित आहे.सदर कावडी खंडाळा येथुन निघुन शिंघणापुर व परतीचा प्रवास फक्त 13 दिवसात पुर्ण करून खंडाळा येथे परत येतात.. कावडी परत आलेल्या दिवशी खंडाळा येथे नगर प्रदक्षिणा घातली जाते या दिवशी ग्रामदैवत श्री शंभुमहादेवाची याञा भरते. सांस्कृतीक कार्यक्रम, कुस्त्या असे विविध कार्यक्रम जञेनिमित्त आयोजित केले जातात.