तुळजापूर / प्रतिनिधी-

ग्राम विकास मंत्री , महिला बाल कल्याण मंत्री  पंकजाताई मुंडे  तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्या असता  भाजपा महिला  मोर्चाच्या पदाधिकारी व  युवती मोर्चाच्या युवतींशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी  महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या विविध योजना महिलांनी मिळवुन देण्यासाठी  योग्य ते सहकार्य करुन  सदैव अग्रेसर राहीन व  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. पुढेही करीन ,असे आश्वासन दिले.

 यावेळी महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी,  युवतींच्या मराठवाडा प्रमुख शर्मिष्ठा कुलकर्णी, युवती प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुजा देडे, जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अंजली साबळे, सौ. वैशाली  व्यवहारे तालुका उपाध्यक्ष ॲड स्वाती शिंदे, ॲड. स्वाती नाळेगावकर, प्रभावती मार्डीकर तालुका अध्यक्ष ॲड क्रांती थिटे, उपाध्यक्ष रूपाली घाडगे, भाजपा युवती जिल्हा उपाध्यक्ष विद्या माने यावेळी उपस्थितीत होते.

 

 
Top