तुळजापूर / प्रतिनिधी-

 राज्य सरकारने ओबीसींचा डेटा लवकरात लवकर सादर करण्याची गरज असल्याचे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच मागील भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका मुंडे यांनी यावेळी केली.

माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि.७) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले, यावेळी त्या बोलत होत्या. पुजारी विकास मलबा यांनी पंकजा मुंडे यांची पूजा बांधली. दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल, याची खात्री व्यक्त केली.तसेच मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, राजसिंहा निंबाळकर,अनिल काळे, सचिन अमृतराव, गुलचंद व्यवहारे, बबन सोनवणे, उमेश गवते, बाळासाहेब शामराज आदी उपस्थित होते. देवी दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 
Top