तुळजापूर  / प्रतिनिधी-

चैञी पोर्णिमा दिनी  श्रीतुळजाभवानी मंदीरात राञी सोलापूर येथील भाविक अरुण दादा रोडगे यांनी दिलेल्या वाघ  छबिना  वाहनावर देविजींचा छबिना आई राजा उदो सदा नंदीचा उदो उदोच्या जयघोषात  पारंपरिक वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांच्या सहभागाने काढण्यात आला.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवारी  देविंजींच्या प्रांगणात उत्सव मुर्ती  चांदीचा मखरीत ठेवुन काढण्यात येतो हा  छबिना काढण्यासाठी नक्षत्र नुसार सिंह,  वाघ, मोर, हत्ती  सह अन्य वाहनांवर देविजींचा छबिना राञी साडेनऊ वाजता काढला जातो. यासाठी भाविक छबिन्यासाठी लागणारे  विविध वाहने भाविक भेट देतात. 

या पार्श्वभूमीवर चैञी पोर्णिमा दिनी शनिवारी सोलापूर येथिल देविभक्त अरुण दादा रोडगे यांनी दिलेल्या वाघ वाहनावर देविंजींचा छबिना काढण्यात आला हे वाहन बनविण्यासाठी सत्तर हजार खर्च आला व ते सोलापूर येथील कलाकाराकडुन बनवुन घेतले होते.


 
Top