तेर/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील   तेर येथे प्रथमच भारतीय पारंपरिक राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशन चे जिल्हा सचिव अमोल कस्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली

  ही  स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली असून १४ एप्रिल ते १६ एप्रिल रोजी तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालायाच्या मैदानावर घेण्यात येणार आहेत . हा खेळ प्राचिन   काळातील भारतीय पारंपरिक खेळ असून तेर प्राचीन सातवाहनकालीन ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध आसल्यामूळे राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे तेर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र,दिल्ली,गोवा,राजस्थान,आँध्रप्रदेश,हरियाणा,दादर नगर हवेली,पाँडेचरी,छत्तीसगड,केरळ,तेलंगणा  , गुजरात, कर्नाटक ,उत्तराखंड,चंदीगड, झारखंड, तामिळनाडू,विदर्भ येथील संघ सहभागी होणार आहेत यात १२ संघ मुलीचे व १८ संघ मूलाचे सहभाग घेणार आहेत या” स्पर्धेतेतील विजेता संघ  थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे.  लगोरी हा पारंपरिक प्राचीन काळातील   प्रसिद्ध  खेळ असल्याने व तेर हे ऐतिहासिक गाव असल्याने   ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांना आवड निर्माण  व्हावी यासाठी तेर येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशन चे जिल्हा सचिव अमोल कस्तुरे यांनी दिली.

 
Top