तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर केंद्र सरकार नियोजित सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मंगळवार दि.19 रोजी,सकाळी 9 ते 5 या वेळेत भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

      या आरोग्य मेळाव्यात आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांचे हेल्थ कार्ड तयार करून देणे, मधुमेह ,रक्तदाब ,कर्करोग इत्यादीवर निदान व मार्गदर्शन, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया, सर्व आजारावर मोफत औषधोपचार सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे जनजागृती, योग व ताणतणाव व्यवस्थापन ,तसेच स्त्रीरोग ,बालरोग, पोटाचे विकार ,डोळ्याचे विकार, कान-नाक-घसा तपासणी, कर्करोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी ,हृदयरोग तपासणी ,आयुर्वेदिक होमिओपॅथिक योगा ,कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया नियोजन ,आहाराबाबत मार्गदर्शन, लैंगिक आजार ,दमा तपासणी, तंबाखू नियंत्रण ,रक्त लघवी ,ईसीजी, क्ष-किरण इत्यादी सर्व विशेषज्ञ मार्फत होणार आहे. 

तरी दि 19 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत होणाऱ्या आरोग्य मेळाव्याचा तुळजापूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय पाटील, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन बोडके,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. राहुल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार व रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी केले आहे.


 
Top