तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मंगरुळ येथे गेली अनेक दिवसापासुन भरदिवसा ही पथदिवे चालुच असल्याने दिवसा पथदिवे बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे यांनी केले आहे.

मंगरुळ (ता. तुळजापूर) येथे राञी उजेड असावा म्हणून विद्युत खांबावर विजेचे दिवे बसवले आहेत. हे दिवे राञी चालु असणे व दिवस बंद असणे गरजेचे असताना राञदिवस गेली अनेक दिवासापासून पथदिवे चालुच असल्याने वीजेचा अनावश्यक वापर होत आहे. एकीकडे लोंडशेडींग केले जात आहे शेतीला पुरेशा दाबाने वीज मिळत नसताना
विजेचा अनावश्यक वापर होत असल्याने दिवसा हे पथदिवे बंद करण्याची मागणी होत आहे. 

 
Top