उमरगा / प्रतिनिधी-

 आपले कुटुंब म्हणजे व्यक्ती विकासाची कार्यशाळा आहे. घरात होणारे संस्कार मुलांच्या विकासात मोलाचे आहेत. आजच्या  धावपळीच्या युगात आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सुजाण पालकांचीं आहे. यां ना त्या कारणांनी कुटूंबे उधवस्त होत आहेत. कुटुंब सुरक्षित राहिल्यास समाज सुरक्षित राहतो समाज सुरक्षित राहिल्यास देश सुरक्षित राहतो. त्या करीता प्रत्येकानी आपल्या कुटूंबातील जबाबदार सदस्य बनून समाज एक संघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आचार्य ज्यूतींधर पुणे यांनी केलें.

त्रिरत्न बुद्धीष्ट सेंटर च्या वतीने   उमरगा येथील बहुजन हिताय वसतिगृहात कौटुंबिक कार्यशाळेचें आयोजन करण्यात आले होते यां वेळी उपस्थित पालकांशी संवाद साधताना तें बोलत होते.यां वेळी धम्मचारी संघभद्र पुणे, त्रिरत्न बौद्ध महासंघ लातूरचे चेअरमन धम्मचारी कल्याणदस्सी, उस्मानाबादचें चेअरमन धम्मचारी रत्नपालीत, सोलापूरचें धम्मचारी करुणादित्य, धम्मचारी ज्ञानपालीत, धम्मचारी ज्ञानसंवंर, धम्मचारी विबोध, धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी प्रज्ञाजीत आदींची उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रात नूतन धम्मचारीचा सत्कार करण्यात आला दुपारच्या सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली यां वेळी आपल्या खुमासदार शैलीत ज्यूतींधर यांनी अनेकांना खीळवून ठेवले होते. स्त्री पुरुष समानता, सु-संवादित वाणी, एक मेकांच्या प्रति मैत्री, वडील धाऱ्याचा आदर, मुलांवर योग्य संस्कार आदी विषयावर मार्गदर्शन केलें.

पुढे बोलताना तें म्हणाले की आपल्या कुटूंबाचे तीन स्तर होतात एक अविकसित, दुसरे विकसणशील व तिसरे विकसित आपण  समाजात  जीवन जगत असताना विकसित होत असतो आणि त्यातून आपली जडणं घडणं होत असते समाजातील आदर्श कुटूंब हेच समाजाला दिशा दर्शक असू शकते आज घरा घरात कलह वाढत चालले आहेत. कुटूंबातील सदस्यांचें रक्षण करण्यासाठी आपला आचार विचार आणि शुद्ध ठेवनें गरजेचे आहे.कुटूंबातील सदस्यांनी एक मेकांचा मान सन्मान वाढवीला पागिजे प्रेमाची वागणूक दिली पागिजे लहान मुलांचे कौतुक केलें पागिजे मोठ्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे चुकीची कबुली दिली पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे तेंव्हाचं कुटुंब चांगले राहू शकते असे तें म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकराचे वडील रामजी सुभेदार यांनी बाल भिवा वर जे बालपनी संस्कार केलें त्याच्या बाळावर बाबासाहेबानी महान कार्य करून जगासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आपन बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून आपले कुटुंब सुधारल्यास समाज आपोआप सुधारेल असे तें म्हणाले.

प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या व तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमाचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. संघंमित्रा कांबळे सुनीता कांबळे यांनी बुद्ध पूजा घेतली यां वेळी विबोध, धम्मभूषण, रत्नपालीत, ज्ञानपालीत आदीची मनोगते झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केलें आभार धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी मानले.

 

 
Top