उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रुपमाता नेचरल शुगर्स युनिट 2 रोशनपुरी (ता.माजलगाव)  बॉयलर अग्नीप्रदीपन मोठ्या थाटात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ॲड. व्यंकटराव गुंड अध्यक्ष रुपामाता उद्योग समूह तसेच येथील उपविभागीय अधिकारी  नीलमजी बाफना यांचा शुभ हस्ते बॉयलर पूजन झाले. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संचालक मा.भाऊसाहेब गुंड यांनी मांडले. त्यांनी माजलगाव कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून सोडवण्यात येईल तसेच भविष्यात दूध डेअरी, इथॉनल निर्मिती करण्याचा मानस आहे. ॲड.व्यंकटराव गुंड यांनी रुपमाता उद्योग समूहाची पार्श्वभूमी सांगितली व पुढील वाटचाल शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले उपक्रम राबविण्यात येतील व अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यात येईल. नीलम बाफना यांनी मनोगतामध्ये रुपमाता उद्योग समूह अंतर्गत नेचरल शुगर्स युनिट होत असलेला कारखाना हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..       

मुख्य पूजा ही रोशनपुरी चे सरपंच  द्धवजी ताकट यांच्या हस्ते झाली. जिल्हा परिषद उस्मानाबादचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी,  ॲड. शरद गुंड इंजिनीयर, संदीप गुंड , बापूसाहेब गुंड चीफ इंजिनियर गुंड येवले , सिव्हिल इंजिनिअर पाठक  व आभार प्रदर्शन भगवानराव कदम,  शेषरावजी , कटके पाटील, श्री गरड,  शिवाजीराव मिसाळ, सुखदेव नाना ताकट, ठेकेदार रोशनपुरी व शिंपेटाकळी येथील ग्रामस्थ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आभार भगवानराव कदम यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल वाघ व नंदकुमार कुलकर्णी सर यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये कारखान्याचे संचालक अजित गुंड, श्रीमती सुलभा गुंड, बाजार समितीचे संचालक शहाजीराव कोलते,हभप परमेश्वर मकुरे,सरपंच खाडे आण्णा,उद्धव काका ताकट ,अंगद कटके,महावीर काका मस्के,अमित अभियंता अजित गुंड कारखान्यातील सर्व अधिकारी ,कर्मचारी, कामगार यांची यावेळी उपस्थिती होती.


 
Top