उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिक दशरथ सावंत, पांडुरंग पंडागळे, सावित्रीबाई पंडितराव कदम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले.  

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण करण्यासाठी केलेली तरतूद पर्याप्त नसल्यामुळे व यात अनेक बाबी अंतर्भूत नसल्यामुळे या कामाचे रुपये ८७.३० लक्ष किमतीचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून जयंतीचे औचित्य साधून आज या कामाचे भूमिपूजन आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या पमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब व ढोकी येथे विविध ठिकाणी भेट देऊन डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास आणि प्रतिमेस अभिवादन करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, अन्नदान आदी सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढवला व त्यांना असेच कार्य अखंडपणे चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले. दैनिक रिपब्लिकन गार्ड वर्तमान पात्राचे श्री. शुभम कदम यांनी गरजुंना प्रातिनिधिक स्वरूपात आ. राणाजगजितसिंह पाटील साहेबांच्या हस्ते वह्यांचे वाटप केले. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून लोकोपयोगी कार्य करणे हीच या महामानवास खरी आदरांजली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, विनोद गंगणे, जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष नारायण नन्नावरे, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पंडितराव जगदाळे, मा. नगरसेवक औदुंबर कदम, नागेश नाईक, नरेश अमृतराव, आनंद कंदले, युवा मोर्चा किशोर साठे, गुलचंद व्यवहारे, राजेश्वर कदम, इंद्रजीत साळुंके यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

 
Top