उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे आ.राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार ६ एप्रील हा भाजपाचा स्थापना दिन असुन या दिवशी पासुन ते महात्मा ज्योतीबा फुले जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासह अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन ६ एप्रील ते २० एप्रील २०२२ पर्यंत केले आहे. या पंधरवाडयात खालील प्रमाणे कार्यक्रम राबवुन संघटन पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहेत.

  ७ एप्रील २०२२ प्रधानमंत्री आयुष्‍यमान भारत योजना,  ८ एप्रील २०२२ प्रधानमंत्री आवास योजना,   ९ एप्रील २०२२ घर घर नल से जल,  १० एप्रील २०२२ पी. एम. किसान सम्‍मान निधी योजना,   ११ एप्रील २०२२ महात्मा ज्योतीबा फुले जयंती,  १२ एप्रील २०२२ कोरोना टीकाकरण स्‍कीम,   १३ एप्रील २०२२ प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना,   १४ एप्रील २०२२ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रील २०२२ असंघठीत श्रमीक (ई-श्रम कार्ड),  १६ एप्रील २०२२ प्रधानमंत्री मुद्रा योजना,   १७ एप्रील २०२२ स्वच्छ भारत अभियान,   १८ एप्रील २०२२ राष्‍ट्रीय पोषण अभियान,   १९ एप्रील २०२२ आजादी का अमृत महोत्सव भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद  जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आयोजित पंधरवाडा कार्यक्रमात मोठया संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी रित्या राबवावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.

 
Top