उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी येथे गुरूवार, 7 एप्रिल ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत वरवंटी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांची सेवा होणार असून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सप्ताहाचे यंदा 28 वे वर्ष आहे.

सप्ताहात गुरूवार, 7 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 5 राधाई महिला भजनी मंडळ (तुळजापूर) चा महिला भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 9 वाजता हभप गायनाचार्य योगेश (बप्पा) इंगळे यांचे हरिकीर्तन होईल. शुक्रवार 8 एप्रिल रोजी बालाजीनगर येथील संत माऊली महिला मंडळाचा भजन कार्यक्रम होईल. रात्री 9 वाजता कालीदास महाराज घरणीकर (लातूर) यांचे हरिकीर्तन, 9 एप्रिल रोजी दुपारी वरवंटी येथील हनुमान महिला मंडळाची भजनसेवा तर रात्री हभप गणेश महाराज क्षीरसागर (गंगाखेड) यांचे हरिकीर्तन, 10 एप्रिल रोजी श्रीराम नवमीदिवशी सकाळी 10 वाजता हभप नितीन महाराज जगताप यांचे कीर्तन तर रात्री हभप महादेव महाराज बोधले यांचे हरिकीर्तन, 11 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथील माऊली महिला भजनी मंडळाची भजनसेवा तर रात्री हभप पांडुरंग लोमटे महाराज (जवळेकर) यांचे हरिकीर्तन, 12 एप्रिल रोजी देवळाली येथील मीराबाई महिला मंडळाची भजनसेवा तर रात्री हभप बालाजी महाराज कुलथे (पुणे) यांचे हरिकीर्तन तर 13 एप्रिल रोजी सकाळी वरवंटी येथील महिला मंडळाची भजनसेवा आणि रात्री हभप दत्ता महाराज भोसले (सोलापूर) यांचे हरिकीर्तन होईल.


 
Top