उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील गणेश नगर येथील 23 वर्षीय रहिवाशी कृष्णा शिवशंकर कोरे यास दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 8 ते साढे नऊ वाजण्याच्या दरम्यान ढोकीपेट्रोल पंपापासून एका अज्ञात व्यक्तीने उस्मानाबाद येथे येण्यासाठी त्यांच्या वाहनामध्ये बसवून ढोकी ते गडदेवधर दरम्यान अज्ञात कारणावरून कृष्णाला दोन अज्ञात इसमांनी ठार मारल्याची फिर्याद त्यांचे वडील शिवशंकर मल्लिकार्जुन कोरे (वय 59 वर्ष) यांनी आनंदनागर पोलीस स्टेशन येथे केली.

  पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे(कृष्णाचे) कपडे काढून त्याचे प्रेत नग्नावस्थेत गडदेवधरकडे जाणाऱ्या कमानीपासून जवळ मोकळे पटांगणात गवतामध्ये फेकून आणि त्यांचा मोबाईल घेऊन पसार झाले. नंतर मयत कृष्णाच्या फोनद्वारे हॉटेल मेघदूत येथे बँक खात्यावरून 2100 रुपये ट्रांजेक्शन करून पुढे सूर्या कॉम्प्लेक्स येथे एका रिक्षावाल्याकडून 3500 रुपये ट्रांजेक्शन केले आहे.

 सी.सी. टि.व्ही वरून प्राप्त झालेल्या फोटोमधील संशयित हे आरोपी म्हणून निष्पन्न होत आहेत तेंव्हा या दोनही संशयितांबाबत माहिती प्राप्त होताच 8390090099 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पो.नि. तानाजी दराडे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.असेही ते यावेळी म्हणाले.


 
Top