उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेस उद्या रविवार िद. दि. 16 फेब्रुवारी रोजी प्रारंभ हो आहे.

 या व्याख्यानमालेत राज्यातील प्रसिध्द विचारवंतांनी या विचार मंचावर येऊन विचार मंथन केले आहे. या वर्षी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सोमवार दि. 18/04/2022 रोजी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सांगली हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीस संविधान आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गणपतराव मोरे (विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर) हे राहणार आहेत.

    मंगळवार दि. 19/04/2022 रोजी मा. प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे, लातूर हे “आंबेडकरवाद : विचारवंतांची आणि साहित्यिकांची भूमिका” या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. यशवंतराव भंडारे (जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद) हे राहणार आहेत. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या दोन्ही व्याख्यानाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांनी केले आहे.


 
Top