तुळजापूर / प्रतिनिधी-

 चैत्री पोर्णिमा  सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनिवार दि.१६रोजी  श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन दोन वर्षापासुन थांबलेला चैञी पौर्णिमेचा वारीखेटा पुर्ण करुन येडाईच्या दर्शनासाठी येरमळ्याकडे रवाने झाले. आज चैञी पोर्णिमा दिनी मंदीरात द्राक्षाची आरास करण्यात आली होती.

 चैञी पोर्णिमेनिमित्त पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनार्थ आरंभ झाला . सकाळी सहा वाजता घाट होवुन श्रीदेविजींना दुग्धअभिषेक व वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर धुपारती करण्यात येवुन अंगारा काढण्यात आला. दुपारी एक ते चार दरम्यान देविजींना असाह्य उष्णतेपासुन सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडला.

आज पहाटे एक ते राञी अकरा पर्यत दर्शन रांगा भरभर हलल्याने मंदीरात गर्दी झाली नाही दर्शन रांगावर दिवसभर धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे स्वता मंदीर गाभाऱ्यात थांबुन लक्ष ठेवुन होते. त्यांना लेखापाल सिध्देश्वर इंतुले,गायकवाड, धनंजय कदम सह  मंदीरचे तसेच खाजगी सुरक्षारक्षक यांनी सहकार्य केले. 

 संध्याकाळी सात वाजता देविजींना पुनश्च दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले व नंतर आरती करण्यात येवुन भातागळी येथील श्रीशंभुमहादेव ची काठी भेट देविंजींच्या मुख्यगृर्भगृहा वरील शिखराला  भेटवली गेली . राञी   देविंजींचा छबिना काढण्यात आल्यानंतर मंहत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा यांनी उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर चैञी पोर्णिमा धार्मिक विधी व याञा उत्सवाचा सांगता झाली.

 

 
Top