उमरगा / प्रतिनिधी-

राष्ट्रीय महामार्गावरील शहराच्या वळण रस्त्यावर त्रिकोळी पाटीवर अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो भरधाव हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने जात असताना गतिरोधकाचा अंदाज आला नसल्याने जागेवर पलटी होऊन गांजाची वाहतूक उघडकीस आली. या टेम्पोमध्ये अडीच किलो वजनाची ५०६ पाकिटे आढळून आली. या गांजाची अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख ५० हजारांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेला टेम्पो (टीएस २५ टी ३९२१) राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या वळण रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दहा मीटर अंतरावर डगमगत जाऊन पलटी झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी ड्रायव्हर अाणि क्लिनर यांना बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने टेम्पो उभा केला असता त्यात भाजीपाल्यासोबतच गांजाची पाकिटे दिसून आली. दरम्यान, घटना घडताच अनेकांनी पाकिटाची पळवापळवी केली.


 
Top