उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  शिवाजीनगर सांजा रोड, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात उस्मानाबाद शहर व परिसरातील सर्व वयोगटातील ४३० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष  .नितीन काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, प्रदेश कार्यकरणी सदस्य कामगार आघाडीचे आनंद भालेराव, लिंबराज डुकरे, अनुसुचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल पेठे, ज्येष्ठ नागरीक अंकुश भालेराव, सदानंद अकोसकर, हिम्मत भोसले, अक्षय भालेराव, मयुर पवार, रणजीक गुरव, विशाप पवळे, जीवन जाधव, जगदीश जगदाळे, पवन दाखले, लखन पेठे, लखन बगाडे, अक्षय डांगे, उमेश जगदाळे, नेताजी शिंदे, नारायण चव्हाण, अंगनवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यां, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ आशीतोष नायक, डॉ.ऋषीकेश जाधव, डॉ. पार्थ शिरोदे, डॉ. तुषार कांबळे, डॉ परविन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, दिनेश पडवळ यांनी परीश्रम घेतले.

 
Top