उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील नटराज नृत्य प्रक्षिक्षण केंद्र जिल्हा कार्यालयात नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य शाखा उस्मानाबाद जिल्हा बैठकीत जिल्हा युवती जेष्ठा पुजा    गायकवाड तर तालुका युवती जेष्ठा सौ. ऐश्वर्या विकास भालेराव यांची २०२३ पर्यंंत सर्वानुमते निवड करण्यात आली. 

नियुक्तीपत्र विभागीय सचिव विशाल टोले , जिल्हा पालक शेषनाथ दगडोबा वाघ , जिल्हाध्यक्षा सौ. संगिता पाटील  यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. जिल्हयातील नृत्य कलाकारांना राज्य देश पातळीवर मंच मिळावा जिल्हाभरातील असंख्य नृत्य कलाकारासाठी उपजिविकासाठी नृत्य परिषद सदैव पाठीशी असेल नवीन नृत्य कलाकारांना संधी देण्याची सातत्याने जिल्हा नृत्य परिषदेचा प्रयत्न राहिल त्याच बरोबर नृत्यामध्ये  रुची असणाऱ्यांना साठी उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्याचा मानस आहे असे जिल्हा पालक शेषनाथ वाघ यांनी मार्गदर्शनपर  मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन व आभार जिल्हा सचिव शीतल देशमुख यांनी मानले.

 
Top