उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आज उस्मानाबाद येथे ओबीसी संघर्ष रथयात्रा आली असता सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले चौकात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. सत्यशोधक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली परखड मते व्यक्त केली. 

यावेळी ज्येष्ठ नेते मार्गदर्शक महादेव माळी, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे,  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग लाटे, अपसिंगा गावाचे सरपंच राजू काका गोरे, अल्पसंख्या सेना अध्यक्ष अमीर शेख, सुधीर बंडगर, लिंगायत संघर्ष समितीचे शिवानंद कथले, उद्योजक बाळासाहेब चिखलकर युवक प्रदेशाध्यक्ष मारुती रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश काळे, सौदागर गोरे  किशोर माळी  अजित माळी, विश्वा गोरे, बालाजी राऊत, सागर चव्हाण, दयानंड साबळे, बापू माने, संघर्ष बनसोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
Top