उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संशोधन समितीने ७एप्रिल रोजी ,महाविद्यालयातील काॅमर्स,अर्थशास्ञ आणि इतिहास विभागास पिएच.डी चे संशोधन केंद्र सूरू करण्यासाठी भेट दिली व तिनही विभागातील आणि ग्रंथालयातील सुविधांची पाहणी केली.

काॅमर्स विषयाच्या संशोधन समितीमध्ये विद्यापीठाचे प्रो.डाॅ.हरिदास विधाते,प्रो.डाॅ.संजय अस्वले,प्रो.एस.व्ही.पंचगल्ले होते,इतिहास विषयाच्या संशोधन समितीमध्ये विद्यापीठाचे प्रो.डाॅ.सतिश कदम,प्रो.डाॅ.सुशीलकुमार सरवदे,प्रो.डाॅ.राजर्षी कुलकर्णी,

अर्थशास्ञ विषयाच्या संशोधन समितीमध्ये प्रो.डाॅ.राम सोलनकर,प्रो.डाॅ.मैंद बी.व्ही,प्रो.पी.बी.बेरळीकर हे होते.

प्रारंभी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख व संशोधन समितीतील अध्यक्ष व सदस्य यांनी डाॅ.बापुजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पुजन केले.संशोधन समितीतील सदस्यांचे स्वागत प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.

सदर समितीला काॅमर्स विभागातील सोईसुविधेचे माहिती काॅमर्स विभागाचे प्रमुख प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्रा.नारायण सकटे यांनी दिली.इतिहास विभाची माहिती प्रा.नील नागभिडे,प्रा.डाॅ.विकास सरनाईक यांनी दिली.अर्थशास्ञ विभागाची माहिती प्रो.डाॅ.जीवन पवार,प्रा.मारूती लोंढे यांनी दिली.

संशोधन समितीने भेट दिल्यानंतर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,काॅमर्स,इतिहास,अर्थशास्ञ व ग्रंथालयात संशोधन करणा—या विद्यार्ध्यांसाठी सर्व सोईसुविधा असल्याने तिनही समिती प्रमुख व त्यांचे सदस्यानी समाधान व्यक्त केल्याने हे तिनही सेंटर सुरू झाल्यास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो पिएच.डी धारकांना लाभ होणार आहे. हे सेंटर लवकरच सूरू होतील आसा आशावाद व्यक्त केला आहे

 
Top